होमिओपॅथीच्या मदतीने हायपर ऍसिडिटी पासून सुटका मिळवा

होमिओपॅथीच्या मदतीने हायपर ऍसिडिटी पासून सुटका मिळवा | Dr. Vaseem Choudhary

हायपर ऍसिडिटी(Hyperacidity)

रोजच्या जीवनशैलीत हायपर ऍसिडिटी(Hyperacidity) ही एक सामान्य समस्या आहे. जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिल्याने किंवा जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने पोटात आंबट ढेकर येणे, गॅस, पोटात जळजळ, आंबट ढेकर येणे, तोंडाला पाणी येणे, पोटदुखी, गॅसच्या तक्रारी, मळमळ आदी त्रास जाणवतात. रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरापर्यंत झोपणे, विडी-सिगारेट, तंबाखू, चहा-कॉफी, फास्ट फूडचे अतिसेवन हे आधुनिक जीवनशैलीचा भाग आहेत, त्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो. आजच्या युगात जवळपास ७० टक्के लोक या आजाराने त्रस्त आहेत. सामन्यतः हा एक अतिशय सामान्य आजार आहे, ज्याचा प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी सामना करावा लागतो. पण काही वेळा हा आजार गंभीर रूप धारण करतो.

हायपर ऍसिडिटीवर होमिओपॅथीची औषधे खूप प्रभावी ठरतात. जाणून घेऊया त्यांची नावे -:

  1. अरजेंटम नायट्रिकम –  सतत मानसिक तणावाखाली असणाऱ्या व्यक्ती ज्यांना पोटात जळजळणे, सतत करपट ढेकर येणे व पोट फुगल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवतात तसेच गोड पदार्थ खाण्याची आवड असणाऱ्यांना काही गोड खाल्ल्यास जुलाब किंवा अतिसाराचा त्रास होतो अशा रुग्णांनी अरजेंटम नायट्रिकम ३० घेतल्यास रुग्णांना आराम मिळतो.
  2. कार्बो व्हेज – चहा, कॉफी, आंबवलेले पदार्थ तसेचं दारू व मांसाहार अतिप्रमाणात करणाऱ्या व्यक्तींमध्ये जेव्हा पोटाचे त्रास सुरू होतात तेव्हा कार्बो व्हेज हे औषध लाभदायक ठरते. चहा – कॉफीसारखे उत्तेजक द्रव घेण्याची गरज भासते आणि त्यांच्या सेवनाने ज्यांना सतत करपट ढेकर येणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात जळजळणे, अचानक मुरडा आल्यासारखे पोट दुखणे ही लक्षणे दिसून येतात. अशा लोकांना कार्बो व्हेज हे औषध गुणकारी ठरते.
  3. अरसेनिक अल्बम – पोटाच्या सर्व विकारांमध्ये अतिशय गुणकारी असे हे औषध आहे. चहा आणि कॉफीच्या सेवनाने होणाऱ्या ऍसिडिटीच्या त्रासासाठी लाभदायक आहे. छातीत जळजळणे, मळमळणे, घशापर्यंत जळजळ होऊन सतत चिडचिड होणे, करपट ढेकर येणे, हिरव्या रंगाची किंवा रक्ताची उलटी होणे या लक्षणांवर अरसेनिक अल्बम ३० घेतल्यास रुग्णांना फायदेशीर ठरते.
  4. नक्स वोमिका – सतत बसून काम व मानसिक ताण यामुळे चहा, कॉफी यांचे केले गेलेले अतिसेवन ह्यामुळे होणाऱ्या त्रासावर गुणकारी असे हे औषध आहे. सकाळी तोंडात आंबट पाणी येणे, मळमळणे, आंबट व करपट ढेकर येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. या रुग्णांना थंड वस्तू तसेच थंड वातावरण सहन होत नाही. त्याचबरोबर खूप तीव्र प्रकाश किंवा तीव्र वास सहन होत नाही ह्यामुळे त्यांना सतत डोके दुखणे व चिडचिड होणे ही लक्षणे दिसून येतात. या व्यक्तींना नक्स वोमिका ३० हे औषध लाभदायक ठरते.
  5. ब्रायोनिया अल्बा – ज्या व्यक्तींमध्ये सर्व शरीरात कोरडेपणा जाणवतो तसेच सतत अशक्तपणा वाटणे, चिडचिड होणे, काही खाल्ल्यास मळमळणे आणि उलटी होणे ही लक्षणे दिसून येतात. अतिसंवेदनशील पचनक्रिया असणाऱ्या लोकांना या औषधाने फायदा होतो.

ऍसिडिटीची लक्षणे आढळल्यास होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार सुरू करावे. कारण प्रत्येकाची औषध मात्रा ही लक्षणानुसार बदलते.

होमिओ केअर क्लिनिक:

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.