मित्रांनो हिवाळ्यामध्ये सतत आपले स्नायू आणि सांधे दुखत असतात आणि त्यात अकडनपणा आणि जकडणपणा येत असतो. यावर कितीही उपचार केले तरी देखील यापासून सुटका मिळत नाही. याचाच विचार करून आम्ही तुमच्यासाठी Homeopathic remedies for muscle and joint pain या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की, स्नायू आणि सांधेदुखी साठी होमिओपॅथी उपचार करून क्षा पद्धतीने आपण कायम स्वरुपी स्नायू आणि सांधेदुःखी पासून सुटका करू शकतो. तर मित्रांनो प्रस्तुत article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा ही नम्र विनंती
स्नायू आणि सांधेदुखी मध्ये काय फरक आहे(What is the Difference Between Muscles and Joint Pain in Marathi)?
मित्रांनो तुम्हाला कदाचित स्नायू आणि सांधेदुखी हे दोन्ही सारखेच वाटत असेल आणि साहजिकच आहे. कारण स्नायू आणि सांधेदुखी हे दोन्ही शरीराच्या एकाच भागांवर परिणाम करत असतात म्हणून त्यांना वेगळे करणे कठीण होऊ शकते. परंतू हे दोन्ही सारखेच वाटत असले तरी देखील या दोघांमध्ये फरक आहे. ते आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगत आहोत. त्यावरून तुम्हाला माहिती होईल की, नेमके स्नायू चे दुखणे काय असते? आणि सांधेदुखी काय असते?
स्नायूदुखी
स्नायू दुखणे हे मानवाच्या शरीराच्या स्नायूंवर परिणाम करत असते आणि वारंवार स्नायूंवर ताण आल्यामुळे किंवा स्नायूंची अचानक हालचाल झाल्यामुळे होत असते. हे सहसा खेळल्यामुळे किंवा तीव्र गतीने होणाऱ्या हालचालीमुळे होतात कारण काही लोकांना जास्त हालचालींची सवय नसते. स्नायू मध्ये दुखापत झाल्यामुळे, अकडण आल्यामुळे किंवा स्नायूंवर सूज आल्यामुळे होतात. जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता तेव्हा तुम्हाला स्नायूंमध्ये वेदना जाणवणार नाहीत परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या स्नायूंच्या हालचाली करत तेव्हा तुम्हाला वेदना जाणवत असतात. जर सूज जास्त असेल, तर तुम्हाला स्नायूंच्या ज्या भागावर वेदना होत आहेत त्या भागाची काही वेळासाठी हालचाल करणे सुद्धा कठीण होत असते.
तुम्हाला त्या वेदना काही सेकंदांपुरती राहतात तर काही महिनो महिने राहत असतात. हे अकडण आल्या सारख्या वेदना आहेत की तीव्र प्रमाणात वेदना आहेत यावर हे अवलंबून असते. जर अकडण सारख्या वेदना असतील तर त्या वेदना काही सेकंदापुरत्या असतात परंतु वेदना तीव्र प्रमाणात असल्या तर त्याच्या वेदना ह्या महीनो महिने असतात.
सांधेदुखी
सांधेदुखी हे स्नायू दुखी च्या उलटे असते. जेव्हा तुम्ही स्थिर एका जागेवर बसून किंवा आराम करत राहता त्यावेळी सांधेदुखी च्या वेदना जाणवतात. अशा प्रकारच्या वेदना सहसा वृध्द काळ आल्याने होत असतात. सांधे हे हाडांना एकत्रित बांधण्याचे काम करतात आणि शॉक सारख्या धक्क्यापासून शरीराचे संरक्षण करत असतात. हे सांधे कूर्चा आणि अस्थिबंधनाने वेढलेले असतात. हे हाडे आणि सायनोव्हीयल द्रवपदार्थांना जोडलेले असतात जे हाडांमधील हालचाल आणि तरलता वाढवतात. मानवाचे जस जसे वय वाढत जाते तसे तसे शरिरातील हड्या देखील कमजोर होता जातात आणि त्यामुळे सांधेही कमजोर होतात.
परिणामी घोटा, कोपर आणि मनगट यासारख्या मुख्य बिंदूंमध्ये अस्वस्थता आणि वेदना निर्माण होत जातात. कित्येकदा कुठलेही कारण नसतांना सांधेदुखी होत असते परंतु हे सामान्य आहे आणि या वेदना काही दिवसातच नाहीशा होऊन जातात. परंतु कित्येकदा अशा वेदना कायमच्या होऊन जातात.
स्नायू आणि सांधेदुखी ची लक्षणे – Symptoms of muscle and joint pain
स्नायूंची झीज झाल्यामुळे किंवा सांध्यांवर जास्त दबाव किंवा ताण आल्यामुळे सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होत असतात. जेव्हा या दोन गोष्टी घडतात, तेव्हा पीडित व्यक्तीला विविध लक्षणांचा अनुभव येण्याची शक्यता असते ते लक्षण पुढील प्रमाणे पाहुया:
- तीव्र वेदना
- सूज येणे
- स्नायूंमध्ये अकडणपणा
- स्नायूंची हालचाल न होणे किंवा हालचाल होण्यास कठीण जाणे
- स्नायूंमध्ये विदृपपणा येणे
स्नायू आणि सांधेदुखी ची कारणे – Reasons of muscle and joint pain
स्नायू आणि सांधेदुखी ची काही कारणे आहेत ते आपण पुढीलप्रमाणे पाहुया:
- थंडीमुळे हालचाल होत नाही
- वृद्धावस्थेमुळे
- अचानक हालचाल केल्यामुळे
- कॅल्शियम ची कमतरता
स्नायू आणि सांधेदुखीसाठी होमिओपॅथी चे उपाय(Homeopathic Treatment for Muscle and Joint Pain)
स्नायू आणि सांधेदुखी साठी फक्त होमिओपॅथी हे एकमेव उपचार आहे असं आम्ही म्हणत नाही परंतु होमिओपॅथी चा वापर न करता जर तुम्ही अॅलोपॅथिक औषधांचा वापर केलात तर त्यानेदेखील तुमचा त्रास कमी होईल परंतु हा त्रास कायमस्वरुपी नाहीसा होईल याची शास्वती नसते तर या प्रकारच्या उपचाराने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला होमिओपॅथिक उपाय निवडण्याची शिफारस करतो.
स्नायू आणि सांधेदुखीसाठी होमिओपॅथिक हा एकमेव असा उपाय आहे जो पारंपारिक औषधांना पर्याय म्हणून आहे. या प्रकारची औषधे रुग्णांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन वेदनांपासून आराम देण्यासाठी सर्वोत्तम आहेत. ही औषधे नैसर्गिक घटकांपासून बनविलेली असल्यामुळे ही औषध घेतल्यामुळे रुग्णांना वेदनांपासून कायमस्वरुपी आराम देते आणि निरोगी सांधे आणि स्नायू राखण्यासाठी कार्य करते शिवाय या औषधांनी कुठलाही दुष्परिणाम होत नाही.
स्नायू आणि सांधेदुखीसाठी होमिओपॅथी मेडिसिन खालील प्रमाणे आहेत:
- Rhus Tox: स्नायूंच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी Rhus Tox हे अव्वल दर्जाचे औषध आहे. हे औषध शरीरात कुठेही स्नायू दुखणे दूर करण्यासाठी वापरले जाऊ शकते. जेव्हा विश्रांतीच्या वेळी स्नायू मध्ये वेदना होतात, स्नायूंच्या अतिवापरामुळे स्नायू दुखतात, जास्त ताण किंवा स्नायू जास्त ताणणे, जसे की अतिव्यायामामुळे स्नायू दुखणे, जास्त धावल्याने पायाचे स्नायू दुखणे, हाताचे स्नायू दुखणे अशा बाबतीत हे औषध मदत करीत असते. त्यासोबतच हे होमिओपॅथिक औषध सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. या औषधाने तीव्र आणि जुनाट दोन्ही सांधेदुखी बरे होतात. जेव्हा रुग्णाला तीव्र वेदनांसह सांध्यातील जडपणाचा अनुभव होतो तेव्हा त्याचा वापर केला जातो. हे होमिओपॅथिक औषध सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर उपचार करते, संधिवाताच्या कारणांपासून ते अति श्रमामुळे झालेल्या जखमांपर्यंत सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी उपयुक्त औषध आहे.
- Bryonia: ब्रायोनिया हे ‘वाइल्ड हॉप्स’ वनस्पतीच्या मुळापासून मिळणारे नैसर्गिक औषध आहे. स्नायूंच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी हे एक उत्कृष्ट औषध आहे. हे औषध वापरण्याचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे स्नायू दुखणे जे हालचालीमुळे वाढते आणि शांत पडल्यावर बरे होते. हे मानेच्या स्नायूंच्या दुखण्यावर आणि पाठीच्या खालच्या स्नायूंच्या दुखण्यावर प्रभावी आहे. ब्रायोनिया मुख्यतः खोकल्यापासून ते ओटीपोटाच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांसाठी उपयुक्त औषध आहे. तसेच होमिओपॅथिक औषधे कोपरांमधील सांधेदुखीच्या वेदनांसाठी देखील वापरली जाते. जेव्हा कोपर सांधेदुखी हालचाल न करताही वाढते तेव्हा ब्रायोनियाचा वापर केला जातो. यामुळे शाश्वत आराम मिळतो. वेदना सोबत कोपरच्या सांध्यामध्ये कडकपणा आणि सूज देखील आहे. त्याकरिता देखील ही औषध अत्यंत उपयुक्त मानली जाते.
- Ruta: रुटा हे ताणतणाव, जास्त ताण किंवा स्नायू फाटल्यामुळे होणाऱ्या स्नायूंच्या दुखण्याला तोंड देण्यासाठी एक उत्तम औषध आहे. स्नायूंचा गैरवापर, स्नायूचा अतिवापर किंवा अपघातामुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो. ज्या व्यक्तींना याची आवश्यकता असते त्यांना प्रभावित स्नायूंच्या भागात जखमासारख्या वेदना होतात. हे औषध जास्त ताणलेल्या स्नायूंना आराम करण्यास आणि बरे करण्यास तसेच वेदनापासून आराम देण्यास मदत करते. तसेच रुटा हे एक प्रभावी होमिओपॅथिक औषध आहे ज्याचा उपयोग कोपर सांधेदुखीच्या उपचारांसाठी देखील केला जातो, विशेषत: जेव्हा वेदना काही हाड्यांच्या टोकाजवळ असते. आपले हात खेचणे आणि वाढवणे यामुळे वेदना वाढतात. हे औषध कोपरच्या सांध्याजवळ सूजलेल्या आणि दुखापतीच्या बाबतीत देखील वापरले जाते.
- Traumacare Cream: हे औषध रुग्णाला दैनंदिन कामांमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम देते. Traumacare Cream वापरणे हा एक प्रभावी पर्याय आहे. या सोल्युशनमुळे रुग्णांना स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते ज्यामुळे त्यांना अस्वस्थता येते आणि त्यांना सामान्य जीवनशैली जगण्यापासून रोखू शकते.
- Sanguinaria Canadensis: डेल्टॉइड स्नायूमधील वेदनांवर Sanguinaria Canadensis हा एक उपयुक्त उपाय आहे. डेल्टॉइड स्नायू वेदनादायक तसेच खूप कडक असतात. जेव्हा हात वर केला जातो तेव्हा वेदना वाढते आणि सामान्यतः रात्री याचा जास्त त्रास होते. उजव्या बाजूच्या डेल्टॉइड वेदनांवर Sanguinaria Canadensis हे उपयुक्त औषध आहे.
यासह होमिओपॅथिक हे औषध खांद्यावर होणाऱ्या सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी देखील वापरले जाते. उजव्या बाजूच्या खांद्याच्या सांध्यातील वेदनांच्या बाबतीत हे सर्वात प्रभावी औषध आहे. रुग्णाच्या उजव्या बाजूच्या खांद्याला कडकपणा जाणवू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या हालचालीने वेदना वाढू शकते. रात्रीच्या वेळी उजव्या खांद्याचे सांधेदुखी वाढते त्याकरिता ही सर्वोत्तम औषध आहे.
वरील आम्ही दिलेली माहिती ही तुमच्या General Knowledge साठी च आहे त्यामुळे जर तुम्हाला देखील स्नायू आणि सांधेदुखी चा त्रास असेल तर त्याकरिता तुम्ही आमच्या Home Care Clinic, Pune इथे नक्कीच भेट द्या. आमच्या या hospital मध्ये अनुभवी डॉक्टरांची टीम असून आमच्या या hospital मध्ये सर्व प्रकारच्या रोगांवर होमिओपॅथी चे नैसर्गिक उपचार कमीत कमी खर्चात केले जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या Homecareclinic.in या official website ला नक्कीच भेट द्या.
Conclusion
मित्रांनो आम्ही तुम्हाला Homeopathic remedies for muscle and joint pain या article च्या माध्यमातून स्नायू आणि सांधेदुखी साठी होमिओपॅथी उपचार सांगितलेले आहेत. ही माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला comment box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका.