Know what is skin pigmentation(Homeopathic Skin Pigmentation Treatment)

manage and control diabetes in Marathi

भारतात मधुमेह(Diabetes) सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. जेव्हा शरीरात जास्त साखर किंवा ग्लुकोज मिळते तेव्हा मधुमेह(Diabetes) होतो हे सर्वाना माहितीच असेल. हा आजार  दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. एकदा हा आजार झाला कि त्याला नियंत्रित करणे सर्वात महत्वाचे ठरते.मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी योग्य उपचार लागतात. नियमित तपासणी केल्यावर साखर  नियंत्रित केली  जाऊ शकते. तसेच, रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम आणि चांगला आहार याचीही मदत होते.

तुमच्या लघवीमध्ये साखर जास्त आहे की नाही हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लघवीचा रंग तपासणे. जर लघवी दुधाळ रंगाची असेल तर याचा अर्थ लघवीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी होमिओपॅथी औषधांचा खूप उपयोग होतो. होमिओपॅथी अंतर्गत, रोगाच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी मूळ कारणावर उपचार केले जातात. होमिओपॅथीमध्ये मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे नैसर्गिकपणे  बनवली जातात. त्यामुळे ते कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जास्त काळ घेण्यासाठी ती सर्वात सुरक्षित समजली जातात. रुग्णाचा इतिहास आणि जीवनशैलीचा अभ्यास करून औषधे दिली जातात.

मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी खालील औषधे सुचवली जातात 

  1. युरेनियम नायट्रिकम- मधुमेहाच्या रूग्णांमध्ये  लघवीतील असंयम, मूत्रमार्गात जळजळ आणि रक्तातील ग्लुकोजच्या वाढीव पातळीमुळे होणारे एन्युरेसिस यासारख्या  तक्रारी आढळतात.यासाठी युरेनियम नायट्रिकम हे होमिओपॅथीचे मुख्य औषध मानले जाते. हे औषध लघवी राखून ठेवण्यासाठी उपयोगी आहे.हे औषध मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासही  मदत करते. तसेच यामुळे  उच्च रक्तदाब ही  नियंत्रणात येतो. पण हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
  2. अब्रोमा ऑगस्टा- मधुमेहाच्या रुग्णांना जेव्हा खूप  अशक्तपणा जाणवतो, झोप लागत नाही  तेव्हा हे होमिओपॅथिक औषध लिहून दिले जाते. ज्या रुग्णांना सतत तहान लागते किंवा तोंडात  कोरडेपणा जाणवतो त्यांच्यासाठी देखील हे चांगले काम करते. मधुमेहात वारंवार लघवी होते ती यामुळे नियंत्रणात येते. हे होमिओपॅथी औषध मधुमेहावरील सर्वोत्तम औषधांपैकी एक मानले जाते.
  3. कोनियम- उच्च रक्त शर्करा असलेल्या रूग्णांमध्ये मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे हात आणि पायांमध्ये अनुभवलेली बधीरता बरे करण्यासाठी हे एक प्रभावी औषध आहे. हे औषध मधुमेहाच्या रुग्णांच्या खालच्या शरीरातील स्नायूंच्या कमकुवतपणाचे व्यवस्थापन करते. हे उच्च ग्लुकोज पातळीमुळे उद्भवलेल्या न्यूरोमस्क्युलर समस्यांवर उपचार करते आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.
  4. फॉस्फोरिक ऍसिड- मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे आणखी एक नैसर्गिक औषध आहे. मधुमेही रुग्णाच्या अनेक  लक्षणांवर हे औषध काम करते. साखर वाढल्यास मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वारंवार लघवी होण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे औषध सुचवतात.
  5. जंबोलनम (काळा मनुका)हे औषध मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते.जांबोलॅनम हे आणखी एक प्रभावी औषध आहे जे मधुमेहाच्या उपचारात मदत करते. हे नैसर्गिक औषध असल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. साखरेच्या पातळी बरोबरच वारंवार  लघवी आणि जळजळ हे सुद्धा  या औषधाने कमी केले जाऊ शकते.
  6. कोनियम- उच्च रक्त शर्करा असलेल्या रूग्णांमध्ये हात आणि पायांमध्ये बधीरता येते. तसेच पायाच्या  स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो. यावर उपचार म्हणून हे औषध वापरले जाते. उच्च ग्लुकोज पातळीमुळे उद्भवलेल्या न्यूरोमस्क्युलर त्रासावर सुद्धा याचा फायदा होतो.

ही सर्व औषधे प्रत्येक रुग्णाचा मधुमेह इतिहास पाहून दिली जातात. याचे प्रमाण कमी जास्त असते, त्यामुळे होमिओपॅथी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

होमिओ केअर क्लिनिक

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.