पिंपल्स मुळे चेहऱ्यावर पडलेले खड्डे आणि होमिओपॅथी उपचार(Homeopathic Treatment For Pits on Face due to Pimples in Marathi)

पिंपल्स मुळे चेहऱ्यावर पडलेले खड्डे आणि होमिओपॅथी उपचार | Dr. Vaseem Choudhary

प्रत्येक स्त्रीला ती सुंदर दिसावी असे वाटते. चेहरा हा स्त्रीचा पहिला दागिना समजला जातो. परंतु काही समस्यांमुळे चेहऱ्यावर डाग पडतात. पुळ्या, मुरूमे, गाठी होतात आणि यामुळे चेहरा खराब दिसायला लागतो. काहीवेळा असा त्रास तात्पुरता जातो आणि पुन्हा येतो. या वारंवार होणाऱ्या त्रासाने काही वेळा चेहऱ्यावर खड्डे पडतात. काही वेळा हे डोळ्यांना जाणवत नाही. पण काही चेहऱ्यांची रचनाच अशी असते की ज्याने हे खड्डे चेहऱ्यावर लगेच जाणवतात व ते खराब दिसतात. या समस्येमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास खचतो. या लेखात आपण त्याविषयीं माहिती जाणून घेऊया.

पिंपल्स होण्याची कारणे –

  • खूप घाम येणे
  • त्वचा खुप तेलकट असणे
  • अनुवांशिक समस्या
  • त्वचेची काळजी न घेणे
  • वातावरणातील बदल
  • आहारातील बदल
  • हार्मोनल बदल
  • बॅक्टेरिअल इन्फेक्शन
  • मानसिक ताण तणाव

पिंपल्समुळे चेहऱ्यावर खड्डे का पडतात

जर आपली त्वचा योग्य प्रमाणात कॉलेजन प्रोटीन बनवत नसेल, खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात बनवत असेल तर चेहऱ्यावर खड्डे पडतात. त्यांचे रोलिंग स्कार्स, बॉक्स स्कार्स, आईस पिक स्कार्स, हायपरस्कोपिक स्कार्स असे प्रकार पडतात. या समस्यांवर आलोपॅथी, होमिओपॅथिक, नेचरोपॅथी असे अनेक उपाय आहेत. कधीकधी त्वचेशी संबधित सर्जरीसुद्धा असतात. त्या फार महाग असतात, त्या सर्वांनाच परवडेल असे नाही.

होमिओपॅथिक का? ही औषधे आजार तात्पुरता बरा न करता मूळापासून नष्ट करतात. ते शरीराची स्वतः च स्वतःला बरे करण्याची क्षमता वाढवतात. यांचे शरीरावर वाईट परिणाम होत नाही.

इथे काही परिणामकरक होमिओपॅथीक औषधांची यादी दिली आहे

  1. बेरबेरीज् एकविफोलिअम – चेहऱ्यावर डाग आणि खड्डे घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. चेहरा पुन्हा उजळण्यासाठी मदत करते.
  2. सायलिसिआ – पुरळानंतर आलेले खड्डे घालवण्यासाठी एकदम गुणकारी औषध आहे. चेहरा पुन्हा पाहिल्यासारखे करतो.
  3. प्सॉरिनम – त्वचा तेलकट असून चेहरा खराब झाला असल्यास आणि चेहऱ्यावर खड्डे असल्यास हे औषध सुचवतात.
  4. बेलाडोना – चेहऱ्यावर लाल पुरळे, डाग आणि त्यामुळे खड्डे असल्यास हे औषध गुणकारी आहे.
  5. मर्करिअस सोल्युबिलीस – खूप घाम आणि खूप पुरळे होऊन खड्डे झाल्यास हे औषध सुचवतात.
  6. कालि ब्रोमॅटम – पसवाले मुरूमे होऊन खड्डे झाले असल्यास हे औषध अगदी गुणकारी आहे.
  7. हेप्टिको मार्क गो क्रीम आणि निऍनिमिड सिरम हे सुद्धा चांगले औषध आहेत.

कोणतेही औषध मनाने घेऊ नका. औषध सुरु करण्यापूर्वी होमिओपॅथीक् डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमचा त्वचेचा अभ्यास करून तुम्हाला योग्य ती औषधे सुचवतील.

होमिओ केअर क्लिनिक:

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.