पावसाळ्यातील साथीच्या आजारासंदर्भात या गोष्टी तुम्ही जाणून घेणे आवश्यक

पावसाळ्यातील साथीच्या आजारासंदर्भात या गोष्टी तुम्ही जाणून घेणे आवश्यक

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता व सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणु, विषाणुंच्या वाढीसाठी पोषक असतो. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढु लागते. वर्षाऋतु हा उत्तरायणामधे येणारा ऋतु असुन या काळात शरीर बल हे कमी असते. तसेच जाठरग्नि मंद झाल्यामुळे पचन शक्ती देखिल मंदावते. यामुळेच रोगप्रतिकार शक्ती देखिल कमी होते.पावसाळ्यात अनेक आजारांची त्यात भर पडते.

पावसाळ्यात होणारे आजार

 • डायरीया
 • त्वचारोग
 • व्हायरल फ्लू
 • डेंग्यू
 • मलेरिया
 • चिकनगुनिया
 • टायफॉइड
 • हिपॅटायटीस
 • कावीळ

लक्षणे :-

 • सर्दी
 • ताप
 • खोकला
 • डोकेदुखी
 • अंगदुखी
 • बद्धकोष्ठता
 • भूक न लागणे
 • घसा दुखणे

होमिओपॅथीमध्ये पावसाळी आजारांवर अनेक प्रभावी उपाय आहेत. समजा हे आजार २,३ दिवसांपेक्षा जास्त टिकले तर तज्ञांकडे जाऊन औषधे घेणे सोयीस्कर ठरते. तसेच काही काळजी घेतली तर आजार न होण्यास प्रतिबंध ठरतो. पावसाळ्यात  आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे.  आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा, यात तांदुळ, गहु तसेच विविध डाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे. या ऋतुमधे मांसाहार टाळावा. हिरव्या पालेभाज्या या ऋतुमधे दुषित असतात व त्यावर जीवाणु, विषाणुंची अतिरिक्त वाढ होत असते, त्यावर अळ्या व लार्वा यांचीही वाढ होत असते.

पावसाळ्यातील साथीचे आजार टाळण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी 

 • या ऋतुमधे जास्त पावसात जाणे टाळावे जाणे झालेच तर छत्री/ रेन कोट यांचा वापर करावा घरी परत आल्यावर अंग व केस पुर्ण कोरडे करावे, पावसात अधिक भिजणे टाळावे.
 • कपडे योग्य न सुकल्यामुळे बर्‍याचदा त्यात आर्द्रता असते व असे कपडे परीधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव असतो त्यामुळे परीधान करावयाचे सर्व बाह्य व अंतर्वस्त्र चांगले सुकवुन मगच वापरावेत.
 • दिवसा झोपणे टाळावे. त्यामुळे  पचनशक्ती अजुन कमी करण्यास मदत करते.
 • घरातील वातावरण स्वच्छ व कोरडे ठेवावे, आजुबाजुस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. आजुबाजुचा परीसर स्वच्छ ठेवुन डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध घालावा.

पावसाळी आजार आणि होमिओपॅथी उपचार 

पावसाळ्यामुळे होणाऱ्या विविध आजारांच्या उपचारात होमिओपॅथी खूप प्रभावी भूमिका बजावते. होमिओपॅथी सर्व वयोगटातील रुग्ण घेऊ शकतात मग ते बालक, तरुण किंवा वृद्ध. विविध होमिओपॅथिक औषधे आहेत जी पावसाळ्यातील त्रासांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत जसे की :Ars. अल्ब. अकोनाईट, एलोस, बेलाडोना, कप्रम मेट., ब्रायोनिया, रुस. टॉक्स., चीन, बाप्तिसिया. ,दुलकमारा, मुंगी. टार्ट, कार्बो व्हेज, इ. ही काही औषधे आहेत जी पावसाळ्यातील आजारांवर उपचार करण्यास मदत करतात. रुग्णांना सल्ला दिला जातो की ते स्वत: घेऊ नका, स्वत: ची औषधे टाळा. तुमच्या क्षेत्रातील पात्र नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.

होमिओ केअर क्लिनिक:

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.