जाणून घ्या इरीटेबल बोवल सिन्ड्रोमचा धोका वाढवणारे घटक (Learn About Factors That Increase The Risk Of Irritable Bowel Syndrome In Marathi)

इरीटेबल बोवल सिन्ड्रोम

अपचन होतंय,पोट साफ होत नाही, जळजळ अशी अनेक कारणे आणि त्यामुळे होणारी  चिडचिड अनेकांनी अनुभवली असेल.. खूपदा आपण अशा समस्यांना क्षुलल्क समजून दुर्लक्ष करतो पण ही सगळी लक्षणे साधी नसून ती इरीटेबल बोवल सिन्ड्रोम ची लक्षणे असू शकतात.

इरीटेबल बोवल सिन्ड्रोम म्हणजे काय (What is irritable bowel syndrome in marathi)?

आयबीएस अर्थात इरीटेबल बोवल सिन्ड्रोम म्हणजे आतड्याच्या जळजळीची लक्षणे. विविध कारणांमुळे आतड्याची होणारी जळजळ किंवा आतड्यात होणार त्रास म्हणजे सोप्या भाषेत आयबीएस. आपण खाल्लेल्या अन्नाचे विघटन होण्यासाठी आपल्या शरीरातील आतड्यांची मोठी जबाबदारी असते. त्यासाठी आतडे निरोगी असणे खूप गरजेचे असते. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण आतड्यात होते. आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम आतड्यामध्ये होते. परंतु आतड्यामध्ये जर आयबीएस म्हणजे आतड्याच्या जळजळीची लक्षणे असतील तर अन्न पचन योग्य प्रकारे होत नाही, आणि त्यामुळे आपल्याला पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

आयबीएसची लक्षणे(Symptoms of IBS in marathi)

आयबीएसची लक्षणे म्हणजे  पोटात वेदना होणे, डायरिया, बद्धकोष्ठता, पोटात वायू आणि गोळा येणे, शौचाच्यावेळेस प्रेशर द्यावे लागणे, पोट साफ न होणे, भावनांवर कंट्रोल न राहणे, स्वभाव चिडचिडा होणे, सारखं सारखं शौचास जावं लागणे तसेच दोन – तीन दिवस शौचास न होणे अशा समस्या निर्माण होतात.आपण खाल्लेल्या अन्नाचे जर योग्य प्रकारे विघटन झाले नाही तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या, शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवतात.

इरीटेबल बोवल सिन्ड्रोमचा धोका कोणत्या गोष्टींमुळे वाढतो हे पाहुयात(Let’s see what factors increase the risk of irritable bowel syndrome in Marathi).

एका अभ्यासानुसार पुरुषांपेक्षा महिला वर्गात आयबीएस होण्याचे प्रमाण जास्त आहे. हा आजार तरुणपणात गाठतो. वयाच्या ४५ नंतर या आजाराची सुरवात होताना फार आढळत नाही.

  1. जेनेटिक कारणे :-   अनेक आजारांप्रमाणे आयबीएससुद्धा जेनेटिक असू शकतो. म्हणजे जर घरातील   कोणाला आयबीएस चा त्रास असेल तर तुम्हाला देखील आयबीएसचा त्रास होऊ शकतो.
  2. खाण्या-पिण्याच्या सवयी :- आपल्याला तर माहीतच आहे आपण काय खातो या वर आपल्या पोटाचे आरोग्य अवलंबून असते. म्हणजे फास्टफूड , ऑईली, फळे, पालेभाज्या… इत्यादी. कधी कधी बाहेरच्या खाण्यातून पोटात इन्फेक्शन होऊ शकते. आणि त्यामुळे आपल्याला आयबीएस होऊ शकतो. जर आपण मसाल्याचे पदार्थ असेच फास्ट फूट जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात खात असू तर आपल्याला आयबीएस त्रास होऊ शकतो.
  3. मानसिक ताणतणाव :- मानसिक तणावामुळे आपल्या शरीरावर विविध परिणाम होतात. कधी छातीवर दाब येतो तर कधी रक्ताभिसरण क्रिया, पचनक्रियेवर परिणाम होतो.  मानसिक विकारा सोबत आढळणा-या आयबीएस मुळे एन्झायटी डिसॉर्डर, पॅनिक डिसऑर्डर, मेजर डिप्रेसिव्ह डिसॉर्डर, बायपोलर डिसॉर्डर, हे विकार होण्याची शक्यता असते.
  4. व्यसन करणे  :- कोणतीही व्यक्ती  जर जास्त प्रमाणात दारू किंवा धुम्रपानाचे सेवन करत असेल तर त्याला आयबीएस होण्याची जास्त शक्यता असते.
  5. आयबीएसला दूर करण्याचे उपाय :- होमिओपथिमध्ये या आजाराचे मूळ कारण शोधून उपाय केले जाते. यावर अनेक औषधे आहेत ज्यामुळे हा आजार बरा होऊ शकतो. तज्ञ डॉक्टराना भेटून इरीटेबल बोवल सिन्ड्रोम या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा.

होमिओ केअर क्लिनिक:

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार  असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.